भाजपकडून पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैशांची देवाण-घेवाण ; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

पुणे: पुण्यातील कसबा-चिंचवड पोटनिवडणुक प्रचाराचा काल (शुक्रवार) शेवटचा दिवस होता. सर्व पक्षांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे. दिग्गज नेते मैदानात उतरले होते. उद्या या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपने पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. 

कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपने पोलिसांच्या मदतीने मतदार संघात पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वेळा पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटल्या जातात. मागच्या निवडणुकीत बारामती, पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले, हे पुराव्यासह उघड झालं आहे. पोलिसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात. भाजपकडून पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे उघड झाले आहे.



 

फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय -

एकनाथ शिंदे यांनी बंड केला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता आणि मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय झाली आहे. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात खूप फरक दिसतोय. त्यांना स्टंट करण्याचा छंद जळला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने