संतुलन साधण्यासाठी लष्कर भरतीत बदल

श्रीनगर: हुशारीबरोबरच ताकदीचे योग्य संतुलन साधण्याच्या हेतूने लष्कराने आपल्या भरतीच्या नियमांत बदल केला आहे,अशी माहिती लष्कराचे भरती अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी दिली. यापूर्वी लष्करात भरती प्रक्रियेच्या शेवटी लेखी परीक्षा घेतली जात होती. मात्र, आता भरतीच्या पहिल्या टप्प्यातच लेखी परीक्षा घेतली जाईल.भरतीप्रक्रियेतून निवडले जाणार उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि बुद्धिमान असतील, यावर भर असेल, असेही कर्नल जी.



सुरेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उमेदवारांच्या शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या या लेखी परीक्षेनंतर घेतल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.कर्नल सुरेश पुढे म्हणाले, की लष्कराच्या भरती प्रक्रियेत करण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे लेखी परीक्षेसाठी आता प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असेल.मात्र, त्यातही भारतीय लष्कर प्रत्येकी २५० रुपये देईल. त्यामुळे, उमेदवारांना प्रत्येकी २५० रुपयेच द्यावे लागतील. अग्निवीरांच्या भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, या महिन्यात त्याची अधिसूचनाही जारी केली आहे,असेही त्यांनी सांगितले. लष्कराच्या बदललेल्या भरती प्रक्रियेनुसार, प्रत्यक्ष भरती मेळाव्यापूर्वी ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. भरती प्रक्रियेतील या बदलासंदर्भात लष्कराने वृत्तपत्रांतही जाहिराती दिल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने