भारतात बनणार कृत्रिम हिरा; आयआयटी कानपूर सरकारला प्रस्ताव पाठवणार

नवी दिल्लीः आयआयटी कानपूर आता प्रयोगशाळेत हिरा बनवणार आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये या लॅबमधून ग्रोन डायमंडला विकसित करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.जगातील अनेक देश प्रयोगशाळेमध्ये हिरा बनवण्यासाठी काम करत आहेत. आता यामध्ये भारतानेही पुढाकार घेतला आहे. यासंबंधी संशोधन करण्याचं काम आयआयटीकडे देण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मतांनुसार २०३० पर्यंत लॅब ग्रोन डायमंड अर्थात कृत्रिम हिऱ्याचा बाजार चार लाख कोटींच्या जवळ पोहोचण्याचा अंदाज आहे.



आयआयटीचे निर्देशक अभय करंदीकर यांनी सांगितलं की, आयआयटीचे संशोधक या तंत्राला विकसित करण्यासाठी सक्षम आहेत. सरकारच्या या स्वप्नाला पूर्णत्व देण्यासाठी संस्था तयार असल्याचं ते म्हणाले.भविष्यात भारतीय बाजारपेठांमध्ये कृत्रिम हिरा येणार असल्याने त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. कृत्रिम हिरा बनवण्यासाठी आयआयटी कानपूर सरकारला प्रस्ताव पाठवणार आहे. त्यानंतर सरकार त्यासाठी निधीची तरदूत करेल.

जगभरातल्या काही देशांमध्ये प्रयोगशाळेत कृत्रिम हिरा बनवण्याच्या प्रक्रियेचं काम सुरु आहे. हा हिरा बाजारात आल्यानंतर त्याची किंमत मूळ हिऱ्यापेक्षा नक्कीच कमी असेल. खरा हिरा सोधणं त्यावर प्रक्रिया करणं आणि बाजारात विकणं; या सगळ्या प्रक्रिया तशा अवघड आहेत. त्यामुळे त्यांचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. कृत्रिम हिरा वास्तवात साकारला गेला तर सरकारसह सर्वसामान्यांचंही स्वप्न पूर्णत्वास जाण्यात मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने