इमानदारी असावी तर अशी! मुंबई, रिक्षा अन् 'तो एक रूपया'; काय आहे प्रकरण?

मुंबई: इमानदारी किंवा प्रामाणिकपणा म्हणजे काय हो? आपल्याला अनेकदा प्रामाणिकपणाची प्रचिती आली असेल. आपणही एखाद्याला मदत करून प्रामाणिकपणाचं दर्शन घडवून दिलं असेल. असे अनेक प्राणाणिक लोकं आयुष्यात भेटत असतात. तर सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.निधी जामवाल यांनी ट्वीटरवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, "अंधेरी स्टेशनपासून घरी जाण्यासाठी रिक्षात बसले. घरी गेल्यानंतर मीटर चेक केलं तर ५४ रूपये झाले होते.



 त्यानंतर मी त्यांना १०० ची नोट दिली आणि त्यानंतर वरून ५ रूपये दिले. त्यांनी मला सर्वांत आधी एक रूपयाचा ठोकळा दिला, त्यानंतर ५० रूपयांची नोट दिली. रोजच्या एवढ्या पळापळीच्या आयुष्यात समुद्राएवढी इमानदारी पाहून माझं मन भरून येतं. प्रामाणिकपणा असावा तर मुंबई सारखा" असं त्यांनी आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिलं आहे.दरम्यान, सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून अनेकांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. युजर्सने सदर रिक्षाचालकाचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने