"काहीही असो आम्ही..." ; उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांचा आधार!

मुंबई: निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आता त्यांच्यासोबत नाही. पक्षाचे नाव शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे उद्धव ठाकरे गटाने सांगितले. 



दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शिवसैनिकांकडून मुंबईत बॅनर लावण्यात आलेत. शिवसेना भवनाखाली बॅनर लावण्यात आले आहेत. निर्णय काहीही असो आम्ही शिवसैनिक कायम मातोश्री आणि ठाकरे परिवारासोबत एकनिष्ठ असणार आहोत, असे बॅनर सेनाभवनाखाली लावण्यात आला आहेत. 

उद्धव ठाकरेंकडे पर्याय -

उद्धव ठाकरे यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार ते निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात न्यायालयात अपील दाखल करू शकतात. त्यांचा युक्तिवाद निवडणूक आयोगाने विचारात घेतला नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने