मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले अर्थसंकल्पाचे तोंडभरुन कौतुक! म्हणाले...

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी मोदी सरकारचा शेटचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी विविध क्षेत्रातील कर आणि सवलतींबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशभरातून अर्थसंकल्पार प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. एकानथ शिंदे म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी आज संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेनुसार अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा मिळाला आहे.



गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा हा अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचे मी मनापासून स्वागत करतो. देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

निर्मला सीतारामन यांनी कर कपातीसह अनेक मोठ्या घोषणा केल्या. आता ७ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. एवढेच नाही तर निर्मला सीतारामन यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली. महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय शेतकरी, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प कसा असेल. निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय पातळीवर मोठ्या घोषणा केल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने