शास्त्राच्या आधारे पंडीत जे सांगतात ते खोटं; भागवतांचं जातीव्यवस्थेबाबत मोठ विधान

दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी जातीवाद यासंदर्भात मोठे विधान केले आहे. देवाने नेहमीच सांगितले आहे की माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यांमध्ये कोणतीही जात-वर्ण नाही.भागवत म्हणाले की, कोणीही उच्च निच नाही, शास्त्राचा आधार घेऊन पंडीत लोक जे सांगतात ते खोटं आहे. जाती-जातीच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमध्ये उच्च नीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ठ झालो आहोत. हा भ्रम दूर करायचा आहे.भागवत पुढे म्हणाले की आपल्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला आहे. याचा फायदा घेऊन आपल्या देशात हल्ले झाले. बाहेरच्या लोकांनी याचा फायदा घेतला. संघाचे प्रमुख भागवत हे मुंबईत संत रोहिदास यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.



देशात विवेक, चेतना या सर्व एक आहेत, त्यात काही फरक नाही, फक्त मते भिन्न आहेत.यावेळी भागवत यांनी प्रश्न विचारला की हिंदू समाजात देशातून नष्ट होण्यीची भीती दिसतेय का? ही गोष्ट कोणी ब्राम्हण तुम्हाला सांगणार नाही. हे तुम्हाला स्वतःलाच समजून घ्यावे लागेल.भागवत पुढे म्हणाले की, आपल्या उपजिवीकेचा अर्थ समाजाबद्दल आपली जबाबदारी हा देखील असतो. त्यामुळे प्रत्येक कामा समाजासाठी असेल तर मग कोणी उच्च, कोणी नीच, किंवा कोणी वेगळे कसे असेल, असेही भागवत म्हणाले.यावेळी मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख देखील केला. भागवत म्हणाले की, काशी मधील मंदीर तोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून सांगितले होते की, हिंदू-मुसलमान सर्व एकाच इश्वराची लेकरे आहेत. तुमच्या राज्यात एकावर अत्याचार होत आहेत, हे चूक आहे. सर्वाचा सन्मान करणे तुमचं कर्तव्य आहे. जर ये थांबलं नाही तर याचे उत्तर तलवारीने देईन.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने