CBI Recruitment 2023 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पद भरती

दिल्ली: द सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन (CBI) ने डेप्युटी अ‍ॅडव्हायझर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इथे सीबीआयच्या शिष्टमंडळात डेप्युटी अ‍ॅडव्हायझर (परकीय व्यापार किंवा विदेशी चलन) यासाठी ही पदभरती होणार असून या पदासाठी १ जागा रिक्त आहे.२०२३ च्या अधिकृत घोषणेनुसार, या पदासाठी आवश्यक पात्रता म्हणजे उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आणि परकीय व्यापार किंवा विदेशी विनिमय क्षेत्रात तपासणी किंवा दक्षता किंवा ऑपरेशनल कामाचा तीन वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी इच्छुकांनी नोटीस निघाल्यापासून ६० दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.



पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी.

परकीय व्यापार किंवा विदेशी विनिमय क्षेत्रात तपासणी किंवा दक्षता किंवा ऑपरेशनल कामाचा तीन वर्षांचा अनुभव असावा.

याशिवाय उमेदवाराचा पदवी अभ्यासक्रम मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या लॉ विभागातून असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

किंवा

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये उमेदवाराची पात्रता ओळखली गेली पाहिजे.

किंवा

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कर आकारणी कायद्यामध्ये डिप्लोमा केलेला असावा.

किंवा

उमेदवाराकडे परदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यवसायात एक वर्ष कालावधीच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय ५६ वर्षांच्या आतील असणं आवश्यक आहे.

वेतन

PB-3 (z 15600-39100/- GP 5400/- सह) (पूर्व-सुधारित) (7 व्या वेतन आयोगानुसार मॅट्रिक्सचा स्तर-IO).

अर्ज कसा करावा

उप संचालक, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, 5-बी, 7वा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003

या पत्त्यावर नोटीस निघाल्यापासून ६० दिवसांच्या आत पोहचवावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने