तुम्हाला माहितीये का? चॉकलेटच्या रंगामागेही दडलाय तुमच्या मनातला अर्थ

मुंबई:  चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही? खर तर हा प्रश्न होऊच शकत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होऊ शकत नाही. कोणालाही गिफ्ट काय द्यायचं म्हटलं तर पहिला ऑप्शन सुचतो तो चॉकलेटचा. त्यात आज व्हॅलेंटाइन विकचा तिसरा दिवस. म्हणजे चॉकलेट डे. आज तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या भावना कोणाजवळ व्यक्त करायच्या असतील तर गोड गोड चॉकलेटसारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. अशावेळी चुकीच्या रंगाचं चॉकटेल देऊन चुकीचा अर्थ पोहचवण्यापेक्षा योग्य अर्थ जाणून घ्या.चॉकलेट फक्त जोडिदारालाच द्यावं असा काही नियम नाही. तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच तुम्ही चॉकलेट देऊ शकतात. प्रत्येकाच्या बाबतीत असणाऱ्या भावना तुम्ही चॉकलेटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचवू शकतात.



डार्क चॉकलेट - डार्क चॉकलेट आपण आपल्या जोडिदाराला सुरक्षित ठेवू. त्याची / तिची काळजी घेऊ असा संदेश जोडिदारापर्यंत पोहचवते. डार्क चॉकलेट चवीला कडू असलं तरी त्याचे फायदे अनेक आहेत.

व्हाईट चॉकलेट - व्हाईट चॉकलेटची टेस्टच वेगळी असते. याची चव सौम्य असते. जर तुमच्या जोडिदाराचा स्वभाव तसाच असेल तर त्याला व्हाइट चॉकलेट गिफ्ट करा.

मिल्क चॉकलेट - मिल्क चॉकलेट म्हणजे व्हाईट चॉकलेट नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. पण दूध टाकून बनवलेल्या चॉकलेटला मिल्क चॉकलेट म्हणतात. याला भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. रोमँटिक भावनांशी मिल्क चॉकलेट जोडलं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने