'पहाटेच्या शपथविधीमुळे...', शरद पवार पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

मुंबईगेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. अशातच पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते. यावर कायमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवार यांनी पुण्यात बोलताना म्हंटलं की, पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली असं वक्तव्य शरद पवार यांनी म्हंटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून राजकारण चांगलंच पेटल आहे. यासंबधी अजित पवार किंवा शरद पवार यांनी कधीच सविस्तर प्रतिक्रिया दिली नव्हती. पहिल्यांदाच शरद पवार यांनी यासंबधी मोठं वक्तव्य केलं आहे.अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?



 उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजनेवाले को इशारा काफी है, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. चिंचवड मध्ये आगामी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला गेल्यानंतर माध्यमांशी बोलताना पवारांनी पहाटेच्या शपथविधी बाबत अप्रत्यक्षरित्या एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे. त्यांच्या शपथविधीला ३ वर्ष पुर्ण झाले आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.यासंदर्भात जयंत पाटील यांनी नुकतचं भाष्य केलं आहे. 'राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्याअनुशंगाने शरद पवारांची ती खेळी असू शकते. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार सोडून गेले. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने