आयोगाने शिंदे गट शिवसेना असल्याचे जाहीर केले, मात्र... ; उज्ज्वल निकमांची महत्वाची माहिती

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देऊन त्यांना ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत. उज्ज्वल निकम म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गट शिवसेना असल्याचे जाहीर केले. मात्र आयोगाने कसबा आणि चिंचवड निवडणूक होईपर्यत हा निर्णय स्थगित केला आहे. निवडणुकीनंतर त्यांचा निर्णय अमलात येईल. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. 



ठाकरे गटाचे म्हणणे आहे की निवडणूक आयोगाने संघटणात्मक काही विचार केला नाही. आयोगाने फक्त शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांचा विचार केला आहे. परंतु संघटना कुणाच्या ताब्यात आहे, याचा विचार आयोगाने केला नाही. यावर दोन्ही गट युक्तिवाद करतील, असे उज्ज्वल निकम म्हणाले.काल कपिल सिब्बल यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. शिंगे गटाचे आमदार आधी सुरतला गेले नंतर गुवाहाटीला गेले. त्यांचे वर्तन चुकीचे आहे. त्यामुळे त्यांना विलगीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना अपात्रतेशिवाय पर्याय नाही. यावर आता शिंदे गटाचा युक्तिवाद महत्वाचा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने