पूर्वी एकाच पक्षाला झेंडा फडकवण्याची परवानगी होती, पण आता..; मोदींचा काँग्रेसवर पुन्हा निशाणा

त्रिपुरा: त्रिपुरामध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांकडून सातत्यानं मोर्चेबांधणी सुरू आहे. याच भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  दौऱ्यावर आले आहेत.दरम्यान, पंतप्रधान मोदी त्रिपुरातील अंबासा इथं विजय संकल्प रॅलीला संबोधित करत आहेत. पीएम मोदी म्हणाले, 'हिंसा आणि मागासलेपण ही आता त्रिपुराची ओळख राहिलेली नाही. त्रिपुरामध्ये यापूर्वी एकाच पक्षाला झेंडा फडकावण्याची परवानगी होती. मात्र, आज भाजप सरकारनं  त्रिपुराला भीती, दहशत आणि हिंसाचारातून मुक्त केलंय.'



PM मोदी म्हणाले, 'आम्ही आमच्या संकल्प पत्रात नवे ध्येय घेऊन नवी पावलं टाकण्याचं ठरवलंय. त्रिपुरामध्ये पूर्वी फक्त डाव्या विचारसरणीलाच सरकारी योजनांचा लाभ मिळत होता. मात्र, आता प्रत्येक नागरिकाला सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. भाजप सरकारनं राज्यात कायद्याचं राज्य प्रस्थापित केलंय.'विरोधकांवर निशाणा साधत मोदी म्हणाले, काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या राजवटीनं अनेक दशकं त्रिपुराच्या विकासात अडथळा आणला. परंतु, भाजप सरकारनं त्रिपुरामध्ये विकास केला. हिंसाचार ही आता त्रिपुराची ओळख राहिलेली नाही. भाजपनं राज्याला भय आणि हिंसामुक्त केलं, असंही त्यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने