पवार अन् शहांच्या चर्चेतून सहकार क्षेत्राला दिशा मिळेल; प्रवीण दरेकरांना विश्वास

पुणे : सकाळ माध्यम समुहाकडून महाकॉन्क्लेव्हचं पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रासमोरच्या अडचणींवर चर्चा होत आहे. आज यामध्ये सहकार क्षेत्रावर चर्चा झाली, या चर्चेत भाजप नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. सहकार चळवळीला शरद पवार आणि अमित शहा यांच्या चर्चेतून दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सहकार क्षेत्रात अडचणी आहेत, त्याला उर्जितावस्था देण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.दरेकर म्हणाले, सामाजिक कृषीबरोबर सहकार क्षेत्राला व्यासपीठ दिल्याबद्दल सकाळच अभिनंदन. आज सहकारी बँकांसमोर अनेक अडचणी आहेत. बँका अडचणीत असल्यानं शासनानं त्यांना निधी द्यायला हवा. त्यामुळं बुडणाऱ्या बँका सुस्थितीत येऊ शकतात.



सहकारी बँकांची आर्थिक उलाढाल कमी होत आहे. काही बँका व्यक्तिगत ताकदीवर पुढे जात आहेत. पण एकूण अडचणी कायम आहेत. त्यामुळे एकत्रित पुढे जायला पाहिजे. अमित शाह यांनी सहकार खात निर्माण केलं, त्यामुळं देश पातळीवर या विषयाला महत्व आलं आहे. त्यामुळं आता केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्र सक्षम करण्याची आवश्यकता आहे.अलिकडे पवारांचा आश्रय आणि योगदान या चळवळीला राहिलेलं आहे. सहकाराला त्यांचा आश्रय आणि आशीर्वाद ते देत असतात, त्यांना यातील बारकावे माहीत आहेत. मी स्वतः 70 ते 80 सहकारी बँकांचा आढावा घेतला असून प्रत्येक बँकेला अर्धा तास देऊन समजून घेत आहे. याबाबत लवकरच राज्य सरकारला निवेदन देऊ. सहकाराची जाण अमित शाह यांना आहे. त्यामुळं याची सुरुवात पवार आणि शेवट शाह यांच्या चर्चेतून दिशा मिळेल. सहकार क्षेत्रात अडचणी आहेत, त्याला उर्जितावस्था देण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने