'लता तू खूप प्रसिद्ध होशील' लहानपणीच्या स्वप्नाचा अर्थ.. दीदींना आधीचं कळालेलं..

मुंबई: स्वरा कोकिला लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. गेल्या वर्षी आजच ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लतादीदींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता दीदींच्या जाण्याने भारतानेच नव्हे तर पुर्ण जगानेच एक अनमोल रत्न गमावला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी…लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला. लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य अभिनेते, दिग्दर्शक होते. लता मंगेशकर यांना घरातूनच संगीत कलेचा वारसा लाभला. वास्तविक, लताजींचे वडील थिएटर आर्टिस्ट तसेच प्रसिद्ध गायक होते.


 

लता मंगेशकर यांनी गायनाने जगभर प्रसिद्धी मिळवली, मात्र त्या की भविष्यात करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणार हे त्यांना लहानपणीच माहीत होतं.लता मंगेशकर 20 वर्षांच्या असताना त्या दिवसाला सहा ते आठ गाणी रेकॉर्ड करत असत. दिवसभर गाणी रेकॉर्ड करून थकून जेव्हा त्या त्यांच्या खोलीत झोपायला जायच्या तेव्हा त्यांना एक स्वप्न पडायचं. लता मंगेशकर या स्वप्नामुळे सतत अस्वस्थ व्हायच्या , त्यानंतर त्यांनी या स्वप्नाबद्दल आपल्या आईला सांगितले. त्यानी आपल्या आईला सांगितले की त्याला स्वप्न पडले की त्या सकाळी समुद्राजवळील काळ्या दगडाच्या जवळच्या मंदिरात एकट्याच उभ्या आहे आणि त्यांना माहित आहे की हे मंदिर कोणत्या देवीला समर्पित आहे.आपल्या स्वप्नाचे वर्णन करताना लता मंगेशकर यांनी आपल्या आईला सांगितले होते की, जेव्हा त्या मंदिराजवळ जायच्या तेव्हा त्यांना मंदिराच्या मागे एक दरवाजा असल्याचं दिसतं. 

त्यांनी तो दरवाजा उघडला तेव्हा काही काळ्या दगडाच्या पायऱ्या उतरत असतांना, त्यात रंगीबेरंगी पाणी दिसत होते. त्या पायऱ्यांवर बसायचे तेव्हा हळूहळू ते रंगीबेरंगी पाणी त्यांच्या पायाला स्पर्श करत असे. या स्वप्नाबद्दल आईला सांगितल्यानंतर त्यानी आईला याचा अर्थ विचारला.लता मंगेशकर यांच्या या स्वप्नाचा अर्थ सांगताना त्यांच्या आईने उत्तर दिले, 'लता हा देवाचा आशीर्वाद आहे. बघ, एक दिवस तू खूप प्रसिद्ध होशील.' त्यानंतर लता मंगेशकर यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या संघर्षाने त्यांना अशा टप्प्यावर आणले होते की त्यांनी गायलेल्या गाण्यामुळं चित्रपट हिट होण्याची खात्री होती. त्यानंतर लता मंगेशकर यांनी मागे वळून पाहिले नाही. लहानपणी आईने सांगितलेले शब्द खरे ठरले. 2001 मध्ये लतादीदींना भारताचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने