भूकंपानंतर तुर्की-सीरियात मृत्यूचे तांडव सुरूच! मृतांचा आकडा 21000 पार

 तुर्की:  तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मृतांचा आकडा सतत वाढत आहे. भूकंपामुळे आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जसजसे कोसळलेल्या घरांचा ढिगारे हटवले जात असताना त्याखालून मृतदेह बाहेर येत आहेत. दरम्यान हवामानामुळे बचावकार्यातही मोठ्या अडचणी येत आहेत. रात्रीचे तापमान शून्याच्या खाली गेल्याने मदतकार्य थांबवावे लागत आहे.तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांच्या लोकांच्या मदतीसाठी जगातील अनेक देश पुढे आले आहेत. आतापर्यंत 70 हून अधिक देश यासाठी पुढे आले आहेत.जागतिक बँकेने तुर्कीला $1.78 बिलीयन डॉलर्सचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांनी या देशांना मदत सामग्रीही पाठवली आहे. अमेरिकेने दोन्ही देशांना 85 मिलीयन डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे.



भारताने देखील संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताकडून NDRF च्या तीन पथके तसेच मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवण्यात आले आहे. भारताकडून चालवण्यात आलेल्या मोहिमेसाठी 'ऑपरेशन दोस्त' (Operation Dost) असे नाव देण्यात आले आहे.तुर्कस्तानमध्ये 6 फेब्रुवारीला पहाटे 4.17 वाजता 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतरही आणखी भूकंपाचे अनेक धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील गाजियांटेप हा होता.त्याची तीव्रता इतकी जास्त होती की या भूकंपाचे हादरे सीरियातही जाणवले. यानंतर बचावकार्य जसजसे सुरू आहे, तसतशी मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. ढिगाऱ्यांच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम अद्याप सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने