तुर्कीत हाहाकार सुरू असतानाच भारतातही हादरे! सिक्कीमध्ये ४.३ तीव्रतेचा भूकंप

मुंबई: तुर्की आणि सीरीयात भूकंपाने हाहाकार माजवलेला असतानाच भारताच्या सिक्कीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सोमवारी (१३ फेब्रुवारी) पहाटे ४.१५ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.याआधी रविवारी आसामच्या नागावमध्ये ४.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दुपारी ४.१८ वाजता १० किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. वृत्तानुसार, बांगलादेश, भारत आणि भूतानच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.गुजरातच्या सुरत जिल्ह्यात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याच्या ४८ तासांत दोन्ही भूकंप झाले. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजिकल रिसर्च (ISR) ने सांगितले की, शनिवारी सकाळी १२:५२ वाजता सूरतच्या पश्चिम दक्षिण पश्चिम (WSW) पासून सुमारे २७ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के नोंदवले गेले.



तुर्की-सीरियात भूकंपामुळे परिस्थिती गंभीर

सध्या तुर्की आणि सीरिया या पश्चिम आशियाई देशांमध्ये भूकंपाने हाहाकार माजवला आहे. ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपात दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर जखमींची संख्या ८० हजारांवर पोहोचली आहे. सध्या ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने