"गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला अन्..."; CM शिंदेंनी सांगितला 'तो' अनुभव

मुंबई:  गुवाहाटीला गेलो तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी फोन करुन आपल्याला आशिर्वाद दिला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज म्हणाले. गुरुदेव चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात, असंही शिंदे म्हणाले. ते जालन्यात बोलत होते.जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जलतारा - जलसंधारणातून ग्रामसमृद्धीकडे ही या मेळाव्याची संकल्पना होती. त्यानिमित्ताने श्री श्री रविशंकर हेदेखील मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीचा अनुभव सांगितला आहे.



महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. यात आज श्री श्री रविशंकर आलेत. त्यांचे आशिर्वाद तुम्हा सगळ्यांना मिळणार आहेत. आम्ही जेव्हा गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशिर्वाद दिला होता. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही लढाई सुरू केलीय. ते म्हणाले, "तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला यश मिळेल. गुरुदेव चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणून आज हा कार्यक्रम होतोय. "दावोसमध्येही श्री श्री रविशंकर भेटल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले,"आम्ही गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला गेलो होते. तिथेही आम्हाला गुरुदेव भेटले. दावोसमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे करार केले. ते प्रत्यक्षात आम्ही आणूच असा विश्वास त्यांनी त्यावेळी व्यक्त केला. त्यांचं काम मोठं आहे."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने