चार लाकडी डबे घेऊन ५० मैल धावली भारतातील पहिली ‘झुकझुक विजेवरची रेल्वे’!

मुंबई: ‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी…’ हे बालगीत तूमच्या लहानपणीही होतं आणि तूमच्या मुलांच्या लहानणातही सोबत आहे. त्या गाण्यातील रेल्वे कोळशावरील म्हणजेच आगीवर धावणारी होती. जशी ती रेल्वे महत्वाची  तशीच विजेवर आलेली रेल्वेही महत्वाची आहे. विजेवरील रेल्वे आजच्याच दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारी १९२५ मध्ये धावली होती.आज भारतीय रेल्वेचा ९८ वा वाढदिवस आहे. आजकालच्या रेल्वेला १५ २० डबे असतात. पण, त्याकाळात केवळ ४ डबे घेऊन ही रेल्वे धावली होती. तिचा वेग काशी ५० मैल इतका होता. डबे हे लाकडी बनावटीचे होते. त्यात मध्ये लोखंडाचा देखील वापर करण्यात आला होता.



मध्य रेल्वेला आधी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी चालवायची. याच कंपनीने ही विजेवर धावणारी लोकल चालवली होती. त्यानंतरच्या काही काळातच मुंबईच्या ईशान्येला नासिक व अग्नेयेला पुण्यापर्यंत तेव्हाच्या जीआयपी रेल्वेने प्रचंड क्षमतेच्या विजेच्या तारा टाकल्या व विजेवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे पुणे व नशिकपर्यंत पोहोचले. ही खरीच क्रांती होती. कारण खंडाळ्याच्या व कसाऱ्याच्या घाटांत कोळशाच्या इंजिनाच्या रेल्वे गाड्या चालवणे कष्टांचे व धोकादायकही होते.विजेवर चालणाऱ्या रेल्वेचा सर्वाधिक फायदा अर्थातच मुंबईकरांना झाला कारण यामुळेच मुंबईकरांची 'जीवनवाहिनी' ठरलेली उपनगरी रेल्वे सुरू झाली. आज या लोकल गाड्यांतून दररोज ४५ लाख मुंबईकर प्रवास करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने