वृद्ध, श्रीमंत अन् खतरनाक! मोदींवर टीका करणाऱ्या जॉर्ज सोरोस यांना परराष्ट्र मंत्र्यांनी सुनावलं

नवी दिल्ली : अदानी-हिंडनबर्ग प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या अमेरिकेतील गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चांगलचं सुनावलं आहे. सोरोस यांच्यासारखे लोक आपले विचार मांडताना विशिष्ट काल्पनिक कथा रचण्याचं काम करत असतात, असं त्यांनी म्हटलं आहे. 



जयशंकर यांनी नक्की काय म्हटलंय?

मी सोरोस यांना केवळ वृद्ध, श्रीमंत आणि आपली भूमिका मांडणारे असं म्हणून थांबू शकतो. पण ते जेष्ठ, श्रीमंत आणि मतं मांडण्याबरोबरच एक खतरनाक व्यक्तीही आहेत. जेव्हा असे लोक आणि इन्स्टिट्युशन विशिष्ट विचार माडंतात तेव्हा ते स्वतःची एक काल्पनिक कथा सांगण्याचा प्रयत्न करत असतात.सोरेस यांसारख्या लोकांना वाटतं की, निवडणुका तेव्हाच चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती जिंकतात. पण जर निवडणुकीचा परिणाम काही वेगळाच आला तर ते त्या देशाच्या लोकशाहीत त्रृटी असल्याचं म्हणतात. तसेच हा सर्व प्रकार खुलेपणानं वकिली करण्याच्या नावावर केली जाते.

जॉर्ज सोरोस यांनी काय म्हटलं होत?

अमेरिकास्थित बिलिनिअर्स गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांचं म्हणणं आहे की, गौतम अदानींच्या साम्राज्यात झालेल्या उलथापालथीमुळं शेअर बाजारात मंदी आली आहे. तसेच यामुळं गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास कमी झाला आहे. यामुळं भारतात लोकाशाहीचा पुनरुद्धार होऊ शकतो. सोरोस यांच्या या विधानावर भाजपनं आक्षेप घेत पलटवार केला होता.सोरोस यांची एकूण संपत्ती ८.५ बिलियन डॉलर असून ते ओपन सोसायटी फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. या फाऊंडेशनद्वारे लोकशाही, पारदर्शकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणाऱ्या समुहांना आणि व्यक्तींना अनुदान देतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने