घाटगे घराणे आणि करवीर संस्थान यांचे दृढ संबंध - श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

कोल्हापूर:  ‘घाटगे घराणे आणि करवीर संस्थान यांचे संबंध पूर्वापार आहेत. करवीर संस्थांनचे दुसरे संभाजी महाराज आणि घाटगे घराणे यांची जवळीक अधिक होती. त्यानंतरच्या सर्वच पिढ्यांनी हे संबंध वृद्धिंगत केले,’ असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले.आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदीतादेवी घाटगे लिखित ‘घाटगेज द राईज ऑफ ए रॉयल डायनेस्टी’ आणि ‘बायजाबाई ज ज्वेल इन द मराठा क्राऊन’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये सोहळा झाला.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘घाटगे घराण्याला मोठा वारसा आहे. बहुतांश मराठा घराणी राजस्थानातून दक्षिणेत आली. महाडिक, शिर्के, घाटगे, डफळे यांचाही त्यामध्ये समावेश आहे. घाटगे आणि शहाजीराजे भोसले आदिलशहाच्या दराहबारात होते. त्यांची मैत्री होती.घाटगे घराण्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे करवीर संस्थानात दत्तक आले. शाहू महाराजांनी आधुनिक भारताचा पाया रचला.करवीर संस्थानमधील दुसरे संभाजीराजे यांचे आणि घाटगे घराण्याचे संबंध अधिक जवळचे होते. पुढच्या पिढीतही ते वृद्धिंगत झाले. नंदीतादेवी घाटगे यांनी लिहिलेल्या पुस्तकातून इतिहासातील अनेक पदर उलगडले आहेत.’



कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, ‘ घाटगे घराण्याला मोठा इतिहास आहे तो या पुस्तका संकलित झाला. एखाद्या इतिहास संशोधकाला लाजवेल अशी संदर्भासह मांडणी केली आहे. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद व्हावा.’नंदीतादेवी घाटगे म्हणाल्या,‘घाटगे घराणे मूळचे राजस्थानचे आहे. आदिलशहा, छत्रपती शिवाजी महाराज, ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश या सर्व शासनकर्त्यांशी त्यांचा संबंध आला.या घराण्याने अनेक पराक्रमी योद्धे देशाला दिले. हा सहाशे वर्षांचा इतिहास प्रेरणादायी ठरेल.’ शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुशीलादेवी घाटगे, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, माजी आमदार अमल महाडिक हे उपस्थित होते. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रास्ताविक केले. नवोदिता घाटगे यांनी आभार मानले.

‘त्यांना’ शिवसेनेचे तिकीट मिळाले

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘मी विक्रमसिंह राजे यांच्या आधी शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभेचे तिकीट मला मिळेल, अशी मला आशा होती. पण, ते माझ्यानंतर शिवसेनेत आलेल्या राजे विक्रमसिंह घाटगे यांना मिळाले, तरीही आमचे संबंध मैत्रीचे होते.’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने