जगात भारी भारतीय नारी; आपल्या देशातल्या महिलांना सोन्याचं वेड जरा जास्तच!

मुंबई: आपल्याकडील महिला घर, मुलं सांभाळण्यात तर अव्वल आहेतच. पण, आणखी एका बाबतीतही त्यांचा डंका जगभर वाजतोय. भारतातील महिलांकडे सोने असण्याचे प्रमाण इतर देशांच्या तूलनेत जास्त आहे.  दक्षिण भारतात तर लेकीला पोतभर सोनं देण्याची प्रथाच आहे. त्यामूळेच सोन्याच्या श्रीमंतीच्या बाबतील भारताचा पहिला नंबर लागतो.भारतात क्वचितच अशी कोणतीही महिला सापडेल जिच्या अंगावर 5 किंवा 10 ग्रॅमपेक्षा कमी सोने असेल. कोणत्याही सणाच्या किंवा लग्नाच्या निमित्ताने भारतीय महिला दागिन्यांची खरेदी करताना नक्कीच दिसतात. तर याउलट इतर देशात सोने घालण्याची आवड जास्त नसल्याने तिथल्या महिला त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत.जागतिक गोल्ड परिषदेच्या अहवालानूसार भारतात एकून २४००० टन सोने आहे. त्यापैकी २१००० टन फक्त भारतीय महिलांकडे आहेत. हे जगभरातील महिलांकडे असलेल्या सोन्याच्या 11 टक्के आहे. डब्ल्यूजीसीनुसार, भारतीय महिलांकडे 22 हजार टन सोने दागिन्यांच्या स्वरूपात आहे.



 एकट्या तामिळनाडू राज्यात ही सरासरी २८ टक्क्यांवर पोहोचली आहे.सोन्याच्या बाबतीत भारतीय महिलांची ताकद जगातील महासत्तांपेक्षा जास्त आहे. एवढं सोनं जगातील अव्वल पाच देश अमेरिका (8 हजार टन), जर्मनी (3,300 टन), इटली (2,450 टन), फ्रान्स (2,400 टन) आणि रशिया (1,900 टन) यांच्या एकूण परकीय साठ्यातही नाही.भारतातील सोने दागिन्यांच्या स्वरूपात आहे. जे भारतीय कुटुंबांकडे असलेल्या एकूण सोन्याच्या सुमारे 80 टक्के आहे. सोन्याच्या दागिन्यांवर, सोन्याच्या मोठमोठ्या कंपन्या मेकिंग चार्ज म्हणून सोन्याच्या किंमतीच्या 14 टक्क्यांपर्यंत आकारतात.महिलांनंतर भारतीय मंदिरात सर्वाधिक सोने सापडले आहे. मंदिरांमध्ये सुमारे 2,500 टन सोने आहे. केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरात तब्बल 1,300 टन सोन्याची नोंद झाली आहे आणि आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिरात 250-300 टन सोन्याची नोंद झाली आहे.

सोन्याच्या खाणीशी संबंधित काही तथ्ये

सोन्याच्या खाणीतून आजपर्यंत 1 लाख 90 हजार 40 टन सोने काढले आहे. त्यापैकी दोन तृतीयांश म्हणजे 1.26 लाख टन 1950  नंतर काढण्यात आले. जगभरातील खाणकामातून दरवर्षी सुमारे ३ हजार टन सोने काढले जाते. पृथ्वीच्या आत अजूनही किती सोने आहे याचा अंदाज वेळोवेळी नवीन शोधांनुसार बदलत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने