'धाराशीव'ला मोदी सरकारचा हिरवा कंदील, औरंगाबादबद्दल मात्र…

मुंबई:  बऱ्याच दिवसांपासून मागणी होत असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात महत्वाची माहिती दिली आहे. उस्मानाबादचं धाराशिव करण्यास हरकत नाही अशी माहिती केंद्र सरकराने केंद्र सरकराने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपची संभाजीनगर करण्याची प्रक्रीया विचाराधिन असल्याचे केंद्राने म्हटले आहे.



औरंगाबादचं नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडून ही महत्वाची बातमी देण्यात आली आहे. आधी ठाकरे सरकारने आणि नंतर शिंदे भाजप सरकारने दोन्ही शहरांच्या नामातराचा निर्णय घेतला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने