भारत - ऑस्ट्रेलिया आज भिडणार; जाणून घ्या सामना कधी अन् कोठे पहाल

मुंबई:  महिला टी 20 वर्ल्डकप 2023 10 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेत सुरू होत आहे. नुकताच भारताच्या 19 वर्षाखालील मुलींनी आयसीसी टी 20 वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला होता. अशीच कामगिरी करण्याची अपेक्षा आता वरिष्ठ महिला संघाकडून करण्यात येत आहे.भारताचा महिला क्रिकेट संघ आधीच दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. तेथे त्यांनी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज याच्यासोबत ट्राय सिरीज देखील खेळली होती. महिला टी 20 वर्ल्डकपचे सराव सामना आजपासून सुरू होत असून आज भारतीय संघाचा मुकाबला बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर दुसरा सराव सामना बांगलादेश विरूद्ध 8 फेब्रुवारीला होणार आहे.

आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकपच्या मुख्य स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून सुरूवात होत असून स्पर्धेसाठी संघांची विभागणी दोन ग्रुपमध्ये केली असून प्रत्येक ग्रुपमध्ये 5 संघांचा समावेश आहे. भारताचा समावेश हा ग्रुप B मध्ये असून या ग्रुपमध्ये भारतासोबतच वेस्ट इंडीज, इंग्लंड, आयर्लंड आणि पाकिस्तान या संघाचा समावेश आहे.भारत ग्रुप स्टेजमध्ये चार सामने खेळणार आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसबोत होणार आहे. त्यामुळे हाय व्होल्टेज सामन्याने भारत आपली वर्ल्डकप मोहीम सुरू करेल.



भारतीय महिला संघाचे वेळापत्रक

12 फेब्रुवारी - भारत विरूद्ध पाकिस्तान, वेळ सायंकाळी 6.30

15 फेब्रुवारी - भारत विरूद्ध वेस्ट इंडीज, वेळ सायंकाळी 6.30

18 फेब्रुवारी - भारत विरूद्ध इंग्लंड, वेळ सायंकाळी 6.30

20 फेब्रुवारी - भारत विरूद्ध आयर्लंड - वेळ सायंकाळी 6.30

सामने कोठे पहाल?

भारतात महिला टी 20 वर्ल्डकप 2023 चे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून होणार आहे. याचबरोबर हे सामना लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे देखील पाहता येणार आहेत. याचे हक्क डिस्ने+ हॉटस्टारकडे आहेत.ग्रुप स्टेजमधील साखळी सामने झाल्यानंतर ग्रुप A आणि ग्रुप B मधील पहिल्या दोन संघांमध्ये सेमी फायनल राऊंड खेळला जाईल. स्पर्धेतील पहिला सेमी फायनल हा 23 फेब्रुवारीला तर दुसरा सेमी फायनल सामना हा 24 फेब्रुवारीला होणार आहे. दोन्ही सेमी फायनल सामन्यातील विजेते संघ 26 फेब्रुवारीला महिला टी 20 वर्ल्डकपवर नाव करण्यासाठी भिडणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने