नमाज पडा अन् हिंदू मुलींना..., बाब रामदेव यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

बारमेर: योगगुरू बाबा रामदेव यांनी एका धार्मिक सभेत इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मा विषयी वादग्रस्त विधान केलं आहे.त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.बाबा रामदेव राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पन्नोनियो मधील ताला गावात ब्रह्मलिन तपस्वी संत धर्मपुरी महाराज यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी झाले होते.यावेळी ते म्हणाले की इस्लाम म्हणजे नमाज अदा करणे आणि, जिहादी बनणे, हिंदू मुलींना उचलून नेणे, हे सर्व नमाज अदा केल्यानंतर शक्य आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ख्रिश्चन धर्माबाबतही वादग्रस्त विधान केलं आहेत.




'जन्नत म्हणजे मिशा कापा, टोपी घाला'

बाबा रामदेव म्हणाले, मुस्लिमांनी फक्त नमाज अदा करणे आवश्यक आहे. नमाज अदा केल्यानंतर काहीही करा, सर्व काही माफ आहे. त्यांच्यासाठी जन्नत म्हणजे घोट्याच्या वर पायजमा घालणे, मिशा कापणे, टोपी घालणे. ते म्हणाले, हे मी म्हणत नाही, पण ते हेच करत आहेत. असा स्वर्ग नरकाहून वाईट आहे. हा वेडेपणा आहे.

'चर्चमध्ये मेणबत्ती लावून पाप धुतले जातात'

यानंतर बाबा रामदेव यांनीही ख्रिश्चन धर्मावर भाष्य केले. ते म्हणाले, दिवसा चर्चमध्ये मेणबत्ती लावल्याने सर्व पापे धुतली जातात. हिंदू धर्मात असे केले जात नाही. ते म्हणाले, मी कोणावरही टीका करत नाही, पण हे लोक असेच आहेत. काही जण संपूर्ण जगाला इस्लाममध्ये धर्मांतरित करत आहेत तर काहींना ते ख्रिश्चनमध्ये धर्मांतर करत आहेत.

'सनातन धर्म सर्वांपेक्षा वेगळा, सेवेचा मार्ग'

बाबा रामदेव म्हणाले, सनातन धर्म हा इतर धर्मांसारखा नाही. ब्रह्म मुहूर्तावर उठणे, भगवंताचे स्मरण करणे, योगासने, ध्यान आणि सेवा करणे हा सनातन धर्म आहे. तुमच्या धर्मासाठी जागृत राहा आणि धर्मगुरूंची हाक ऐका.रामदेवबाबा यांनी या अगोदर ठाण्यातील एका योग कार्यक्रमामध्ये बोलताना एक विधान केलं. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं होतं.विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे या सर्वांच्या उपस्थित केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा वाद चिघळला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने