टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; घातक गोलंदाजाचे होणार पुनरागमन

मुंबई: भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील नेटमध्ये गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या व चौथ्या कसोटीत त्याचे भारतीय संघात पुनरागमन होण्याचे संकेत मिळाले आहेत. भारतासाठी ही आनंदाची बाब असणार आहे.भारतीय संघासाठी आगामी काळ महत्त्वाचा असणार आहे. या वर्षात जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना, एकदिवसीय विश्‍वकरंडक यांसारख्या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे बुमराचे तंदुरुस्त असणे गरजेचे असणार आहे.

याप्रसंगी बीसीसीआयच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले की, बुमराने नेटमध्ये गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. त्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा त्रास दिला नाही, तर त्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाच्या संघात पुनरागमन होऊ शकते, असेही त्यांनी विश्‍वासाने सांगितले.



अनुपस्थितीचा फटका?

बुमराच्या अनुपस्थितीचा फटका टीम इंडियाला बसण्याची दाट शक्यता आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव व जयदेव उनाडकट या वेगवान गोलंदाजांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. अर्थात भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असतो.

बुमरा आणि दुखापतींचा टप्पा

इंग्लंड दौऱ्यानंतर पाठीची दुखापत

दुखापतीमुळे वेस्ट इंडिज दौरा व आशियाई करंडकाला मुकला

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी व निवड समितीकडून टी-२० विश्‍वकरंडकासाठी खेळवण्याचा हट्ट

ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त सहा षटके गोलंदाजी केल्यानंतर विश्‍वकरंडकामधून माघार

पाच महिन्यांनंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने पुनरागमन

पण पुन्हा पाठीच्या दुखण्याने माघार

न्यूझीलंड मालिका व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटींना मुकला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने