कोण होत्या कनक रेले? ज्यांच्या निधनानं डीम गर्ल हेमा मालिनी यांचे मोठे नुकसान..

मुंबई: देशातल्या प्रसिद्ध डान्सर-कोरियोग्राफर आणि पद्म विभूषण पुरस्कारानं सम्मानित असलेल्या कनक रेले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहेत. कार्डिएक अरेस्टमुळे कनक रेले यांचे निधन झाल्याचं समजत आहे.त्यांच्या निधनामुळे कलाप्रेमींना मात्र मोठा धक्का बसला आहे. ते सगळेच आपल्या आवडत्या डान्सरचं स्मरण करताना दिसत आहेत. हेमा मालिनी यांनी देखील कनक यांचे स्मरण करत त्यांच्या नावानं एक भावूक नोट शेअर केली आहे.हेमा मालिनी यांचे क्लासिकल डान्सशी फार जवळचे नाते आहे आणि बॉलीवूड व्यतिरिक्त त्यांनी आपल्या क्लासिकल डान्सचे अनेक ठिकाणी परफॉर्मन्सेस दिले आहेत...आणि यामुळेच हेमालिनी यांचे कनक रेले यांच्याशी खास नाते जोडले गेले होते.



हेमा मालिनी यांनी या दुःखद प्रसंगी कनक रेले यांच्या सोबतचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की-''आज खूप दुःखद दिवस आहे. आणि देशाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. खासकरुन माझं सर्वात अधिक नुकसान झालं असं मी मानते''.''आम्हा दोघीत खूप चांगली मैत्री होतीच आणि एकमेकीं प्रती सम्मानही होता. पद्मविभूषण डॉक्टर श्रीमती कनक रेले,मोहिनी अट्टम डान्सर,कोरियोग्राफर आणि नालंदा डान्स रिसर्च सेंटरच्या फाऊंडर. त्यांच्या निधनानंतर क्लासिक डान्सचं एक पर्व संपल्यासारखं वाटतंय''.'' या कलाक्षेत्रात त्यांचे योगदान अद्भूत होते. त्यांचे सौंदर्य आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व एकदम प्यूअर होतं. नालंदामधील त्यांच्या संपूर्ण परिवाराप्रती माझ्या संवेदना मी व्यक्त करते. त्यांच्याशी असलेली माझी मैत्री मी कायम लक्षात ठेवेन''.

कनक रेले यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर कलेच्या दुनियेत त्यांचे नाव खूप सन्मानानं घेतलं जायचं. त्यांचा जन्म ११ जून,१९३७ मध्ये गुजरात मध्ये झाला होता. त्यांनी कोलकाताच्या शांतिनिकेतन मध्ये आपल्या काकांसोबत बालपण घालवलं आहे.तिथे त्यांना कथकली आणि मोहिनीअट्टम शिकण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांच्या मनात कलेविषयी सदभावना आणि आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी कलाक्षेत्रातच आपलं करियर बनवायचं ठरवलं.कनक रेले यांना भारत सरकारतर्फे आपल्या करियर दरम्यान अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आलं आहे. त्यांना १९८९ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं आणि २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं आहे.याव्यतिरिक्त त्यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे कालीदास पुरस्कारानं देखील सम्मानित करण्यात आलं आहे. ६ दशकांहून अधिक काळ त्या आपल्या करिअरमध्ये सक्रिय राहिल्या.आपल्या निधनापूर्वी पर्यंत त्या कामात सक्रिय राहिल्या. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि एम एस सुभालक्ष्मी पुरस्कारानं सम्मानित केलं गेलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने