कर्नाटकमध्येही बनणार राम मंदिर; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बजेटमध्ये घोषणा

कर्नाटक: कर्नाटकमध्ये यंदा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीचे वर्ष असल्याने अर्थसंकल्पात अनेक लोकाभिमुख घोषणा केल्या आहेत.सीएम बोम्मई यांनी बजेटमध्ये राम मंदिर बांधण्याची घोषणा केली आहे. राजधानी बेंगळुरूला 10 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.रस्ते बांधणीसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीबीएमपीच्या अखत्यारीत येणाऱ्या 110 गावांचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.

महसूल 20 टक्क्यांनी वाढला :

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभेत सादर केलेल्या त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, राज्य सरकारचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 3.09 लाख कोटी रुपये आहे.मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीनंतर राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली आहे. यंदा महसूल वाढीचा अर्थसंकल्प सादर केला गेला. कर्नाटकच्या कर महसुलात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.



मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा :

  • कर्नाटकातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी येत्या दोन वर्षांत एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • राज्याची राजधानी बेंगळुरूपासून 45 किमी अंतरावर असलेल्या रामदेवरा बेट्टा हिल, ज्याला रामनगर म्हणूनही ओळखले जाते, येथे भव्य राम मंदिर बांधले जाईल.

  • शेतकऱ्यांना दिले जाणारे बिनव्याजी कर्ज 3 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आले आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जीवन ज्योती विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 150 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

  • शेतकऱ्यांना चंदनाची नवीन वाण देण्यात येणार आहे. रेशीम शेती 10 हजार एकरपर्यंत वाढवली जाईल.

  • सिद्धलगट्टा येथे 75 हायटेक रेशीम बाजार उभारण्यात येणार आहेत. बेघरांसाठी नवीन घरे बांधली जातील. यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

  • मनरेगा अंतर्गत 88 लाख लोकांना रोजगार दिला जाणार आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अत्याधुनिक स्टार्टअप पार्क तयार केले जाईल. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • बेंगळुरूमधील ट्रॅफिक जॅम कमी करण्यासाठी 288 किमी लांबीचा सॅटेलाइट टाउन रिंग रोड बांधला जाईल. यासाठी भारत सरकारने 13,139 कोटी रुपये दिले आहेत. कर्नाटक सरकार भूसंपादनाच्या खर्चाच्या 30 टक्के रक्कम देणार आहे.

  • वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पाच किलोमीटरचा एलिव्हेटेड रस्ता करण्यात येणार आहे. हा रस्ता टिन फॅक्टरी ते मेधाहल्लीपर्यंत जाणार आहे.

  • याशिवाय यशवंतपूर स्टेशन ते मठीकेरे आणि बीईएल रोडपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये खर्च येणार आहे.

  • दूरदर्शनच्या मालगुडी डेज या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक दिवंगत शंकर नाग यांच्या नावाने शहरे आणि गावांमधील मोकळ्या जागेवर ऑटो स्टँड बांधले जाणार आहेत.

  • राज्य महामार्ग विकास प्रकल्पाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात 1,700 किमीचे महामार्ग रस्ते बांधले जातील. त्याची किंमत दोन हजार कोटी रुपये असेल.

  • बंगळुरू मेट्रो रेल योजना सध्या 50 किमीच्या नेटवर्कमध्ये पसरलेली आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गाला सेंट्रल सिल्क बोर्ड जंक्शनला जोडण्यासाठी 58.19 किमी लांबीचे रेल्वे नेटवर्क तयार होईल. त्याच्या 30 स्थानकांवर वेगाने काम सुरू आहे. येत्या वर्षभरात 40.15 किमीचा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.


  • मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम गेल्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले होते. 44.65 किमी लांबीच्या 31 स्थानकांसह दोन कॉरिडॉरचा प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

  • या प्रकल्पाची अंदाजे किंमत 16,328 कोटी रुपये आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर ते सुरू होईल.

  • नंदी हिल्सवरील रोपवे पीपीपी मॉडेल अंतर्गत पूर्ण केला जाणार आहे. हंपीचे विजया विठ्ठला मंदिर आणि गोल गुंबाज मंदिर यांसारखी पर्यटन केंद्रे विकसित केली जातील. आधुनिक प्रकाश सुविधा, थ्रीडी प्रोजेक्शन मॅपिंग इत्यादींसाठी 60 कोटी रुपये दिले जातील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने