भाजपाचा 'हुकमी एक्का' उतरणार मैदानात; विरोधकांचं टेन्शन वाढलं!

पुणे: पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून याची राज्यभर चर्चा आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी या दोन्ही ठिकाणांवर मतदान पार पडणार असून, काल संध्याकाळपासून कसब्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सात तास बैठका पार पडल्या आहेत. त्यामुळे कसब्यासह चिंडवडची जागा जिंकण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.



या सर्वांमध्ये कसब्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काल फडणवीसांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता स्वतः गिरीश बापट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.आजारी असूनही खासदार गिरीश बापट आज कसबा पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरणाची शक्यता वर्तवली जात असून, संध्याकाळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बापट मार्गदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.केसरी वाड्यात होणाऱ्या कार्यक्रमात बापट स्वतः हजर राहून किंवा ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे.येत्या २६ तारखेला होणऱ्या मतदानापूर्वी बापटांचे मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जात असून, मतदानाच्या काहीदिवस आधी भाजपनं निवडणुक जिंकण्यासाठी कसब्यातील हुकमी एक्का बाहेर काढल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने