अदानी ग्रुप आता हिंडेनबर्गशी करणार दोन हात; उचललं मोठ पाऊल

मुंबई: शेअर बाजारातील कथित घोटाळा बाहेर काढत हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीनं अदानी ग्रुपला चांगलंच अडचणीत आणलं आहे. यामुळं अदानींना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावं लागलं आहे.पण हिंडेनबर्ग काही थांबायचं नाव घेत नाहीए, एकामागून एक अदानी ग्रुपला टार्गेट करत आहे. यापार्श्वभूमीवर अदानी ग्रुपनं हिंडेनबर्गशी दोन हात करण्याची तयारी केली असून त्यासाठी एक मोठं पाऊलही उचललं आहे. फायनान्शिअल टाइम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. 



हिंडेनबर्ग रिसर्च विरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी अदानी ग्रुपनं वॉचटेल नामक कायदेशीर लढा देणाऱ्या अमेरिकन कंपनीला पाचारण केलं आहे. हिंडेनबर्ग अमेरिकन कंपनी आहे, त्यामुळं अमेरिकनं लॉ फर्मद्वारे त्याच्या कारवायांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अदानी ग्रुपचा आहे.ब्रिटिश वर्तमानपत्र फायनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार, हिंडेनबर्गशी कशा प्रकारे डील करायचं याचासाठी अदानी ग्रुपनं वॉचटेलच्या लिप्टन, रोझन आणि कार्ट्झ या वरिष्ठ वकीलांचा सल्ला घेणार आहे. न्यूयॉर्कस्थित वॉचटेल ही कंपनी कॉर्पोरेट लॉ संबंधीच्या केसेसवर मोठ्या प्रमाणावर काम करत असते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अदानींच्या शेअरमध्ये सातत्यानं मोठी पडझड झाली. अदानी एन्टरप्राईजेसनं शेअर्समध्ये घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंडेनबर्गनं यासाठी अदानी ग्रुपला 'अनएथिकल शॉर्ट सेलर' असं म्हटलं आहे.यानंतर अदानी ग्रुपनं हिंडेनबर्गचा रिपोर्टमध्ये निव्वळ खोटेपणा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अदानी एन्ट्रप्राईजेस लिमिटेडचा पूर्णपणे विकला गेलेला २०,००० कोटींचा फॉलोऑन पल्बिक ऑफर (एफपीओ) रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने