घोटाळ्याचा फास अधिक घट्ट; आता केजरीवालांच्या PA ला समन्स

दिल्ली: दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खासगी पीएला समन्स बजावले आहे.ईडीच्या आरोपपत्रात केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख केल्याच्या काही आठवड्यांनंतर हे समन्स बजावण्यात आले आहे. याप्रकरणात सत्येंद्र जैन यांचीही चौकशी करण्यात आली असून, या सर्व प्रकरणात सीबीआयहीदेखील तपास करत आहे.या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात विजय नायर, सरथ रेड्डी, बिनय बाबू, अभिषेक बोनपल्ली आणि अमित अरोरा यांची नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली आहेत.



याशिवाय उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील या प्रकरणात आरोपी आहेत. ईडीने अद्याप या प्रकरणात सिसोदियांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नाही, परंतु तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सप्टेंबर 2022 च्या अखेरीस ते मागे घेण्यात आले. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणात दिल्लीचे उपमुखमंत्री मनीष सिसोदिया यांनीही अटकेची भीती व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने