शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेसाठी फक्त ३ जागा? शाहांनी दिलेल्या नाऱ्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता

कोल्हापूर  अमित शाहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. भाजपला देशात जरी यश मिळत असलं तरी कोल्हापूर भाजपमुक्त आहे. त्यामुळे अमिक शाहा यांनी टार्गेट कोल्हापूर फिक्स केले आहे. आज अमित शाहा यांनी कोल्हापुरात जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा भाजप आणि मोदींच्या झोळीत टाका अशी साद घातली आहे. त्यामुळे शिंदे गटाला काय मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी महाराष्ट्र भाजपने राज्यात मिशन ४५ चा नारा दिला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात रालोआ ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला होता. आज शाहांनी ४८ जागांचा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला वरच्या फक्त तीन जागा मिळतील का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. 



लोकसभा निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. कोल्हापुरात शिंदे गटाचे वर्चस्व आहे. मात्र त्या जागेवर भाजप दावा करणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी आजची सभा नियोजित होती. अमित शहा याच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमित शाह कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची रणनिती आखली तसेच राज्यातील लोकसभेच्या ४८जागांवर दावा केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने