मेघा इंजीनीयरींगचे संरक्षण उत्पादन क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल

अबूधाबी - भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आयकॉम या मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या समूह कंपनीने एक मोठी झेप घेतली आहे.आयकॉम कंपनी आता हलक्या अग्निशस्त्रास्त्रांचे देशाअंतर्गत उत्पादन करणार आहे. मंगळवारी (२१ फेब्रुवारी) आयकॉमने संयुक्त अरब इमीरातमधील (युयेई) कॅराकल या अग्रगण्य शस्त्र निर्मीती करणाऱ्या कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतरणचा करार केला आहे.'मेक इन इंडिया'आणि 'आत्मनिर्भर भारत' या उपक्रमांतर्गत आयकॉम कंपनी आता भारतीय बाजारपेठेसाठी हलक्या अग्निशस्त्रांचे उत्पादन करणार आहे.अबुधाबी इथे भरलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनात दोन्ही कंपन्यामध्ये या करारावर स्वाक्षरी झाली.आयकॉम ही कॅराकल कंपनीच्या हलक्या शस्त्रांस्त्रांची संपूर्ण श्रेणीचे उत्पादन करेल.यामध्ये प्रसिध्द कॅराकल EF पिस्तूल, आधुनिक सीएमपी 9 सबमशीन गन, CAR 814, CAR 816 आणि CAR 817 टॅक्टिकल रायफल,CAR 817 DMR टॅक्टिकल स्नायपर रायफल, CSR- 50 आणि CSR 338 आणि CSR 308 बोल्ट अॅक्शन स्नायपर रायफल आणि CSA 338 अर्ध-स्वयंचलित स्नायपर रायफलचा समावेश आहे.



आयकॉमचे प्रमुख सुमंथ पी यांनी भारतीय संरक्षण उद्योग आपली सार्वभौम उत्पादन क्षमता विकसित करण्याच्या मार्गावर प्रगती करत असून कॅराकल बरोबरचा हा करार संरक्षण क्षेत्राला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे सांगीतले. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगीतले.आयकॉमच्या हैदराबादमधील उत्पादन केंद्रात कॅराकलच्या हलक्या शस्त्रांची संपूर्ण श्रेणीचे उत्पादन केले जाईल.आयकॉम कंपनी क्षेपणास्त्रे आणि उप-प्रणाली तसेच संप्रेषण आणि EW प्रणाली, रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स, कंपोझिटसह युद्धसामग्री, कमांड कंट्रोल सेंटर, यूएव्ही आणि अँटेना, सैन्याची सुरक्षीत आश्रयस्थाने, ड्रोन आणि काउंटर-ड्रोन प्रणाली निर्मीती करणाऱ्या मोठ्या कंपन्यापैकी एक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने