135 लोकांचा जीव घेणारा पूल का कोसळला? एसआयटीच्या रिपोर्टमधून खुलासा

नवी दिल्ली : गुजरातमधील मोरबी इथं गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेवरुन देशभरात बराच गदारोळ माजला होता. पण हा पूल कशामुळं कोसळला याचा खुलासा आता झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गुजरात सरकारनं नेमलेल्या एसआयटीनं हा खुलासा केला आहे.एसआयटीनं आपला रिपोर्ट नुकताच राज्य शहरी विकास विभागाद्वारे मोरबी नगरपालिकेकडं सुपूर्द केला आहे. अजंता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडनं (ओरेवा ग्रुप) मच्छू नदीवर ब्रिटिशकालिन सस्पेंशन ब्रीजच्या देखभालीची जबाबदारी होती. त्यानुसार एसआयटीला या पूलाची डागडुजी, देखभाल आणि नियंत्रणात अनेक चुका आढळून आल्या.



दोन मुख्य केबल्सपैकी एक केबल गंजली

एसआयटीच्या चौकशीत स्पष्ट झालं की, मच्छू नदीवर १८८७ मध्ये तत्कालीन शासकांनी बनवलेल्या या पूलाच्या दोन मुख्य केबल्समध्ये एक केबल पूर्णपणे गंजली होती. तसेच यातील जवळपास अर्ध्या तारा ३० ऑक्टोबर रोजी केबल तुटण्यापूर्वीच तुटल्या असल्यानी शक्यता आहे. एक आयएएस अधिकारी, एक आयपीएस अधिकारी, एक सचिव, एक मुख्य अभियंता आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरसह एक प्राध्यापक अशा पाच जणांची ही एसआयटी आहे.

आधीच तारा तुटल्या होत्या

एसआयटीच्या रिपोर्टनुसार, नदीवरील या पूलाची मुख्य केबल तुटली, ज्यामुळं ही दुर्घटना घडली. चौकशी दरम्यान हे स्पष्ट झालं की, केबलच्या ४९ तारांपैकी २२ तारा गंजल्या होत्या. यावरुन हे सिद्ध होतं की, या तारा प्रत्यक्ष दुर्घटनेपूर्वीच तुटल्या असतील. तर उर्वरित तारा दुर्घटनेवेळी तुटल्या. पूल कोसळला तेव्हा त्यावर सुमारे ३०० लोक होते. ज्यांचा भार हा पुलाच्या वहन क्षमतेपेक्षा जास्त होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने