मुकेश अंबानींची मोठी डील; कापड क्षेत्रातील 'ही' कंपनी घेतली विकत, गुंतवणूकदारांना...

मुंबई: मुकेश अंबानी यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी कर्जबाजारी असणाऱ्या कापड क्षेत्रातील कंपनीचे नशीब बदलणार आहेत. याबाबत एनसीएलटीकडून मंजुरी मिळाली आहे.नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझच्या संयुक्त बोलीला मंजुरी दिली आहे. एनसीएलटीच्या या निर्णयाचा कंपनीच्या गुंतवणूकदारांनाही मोठा फायदा होणार आहे.शेअर बाजाराला माहिती देताना, सिंटेक्स इंडस्ट्रीजने सांगितले की, NCLT खंडपीठाने आदेश दिले आहेत की, रिलायन्स आणि ACRE ने सादर केलेल्या कर्ज निराकरण योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

सध्या सिंटेक्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत. रिलायन्स-एसीआरई योजनेमध्ये शेअर भांडवलात कपात आणि शून्य मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे डिलिस्टिंग समाविष्ट आहे.रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स आणि ACRE यांनी संयुक्तपणे सुमारे 3650 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता. त्याच वेळी, सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या कर्जदारांनी संयुक्त बोलीच्या बाजूने मतदान केले.दुसरीकडे, गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कंपनीच्या समस्या सोडवण्यासाठी एनसीएलटीची मदत घेण्यात आली होती.





कंपनीचे कर्ज किती आहे?

सिंटेक्स इंडस्ट्रीज विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया एप्रिल 2022 मध्ये सुरू झाली. सध्या कंपनीवर 7500 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. बोली लावणाऱ्यांमध्ये वेलस्पन समूहाची फर्म इझीगो टेक्सटाइल्स, जीएचसीएल आणि हिमसिंगका व्हेंचर्स यांचा समावेश होता.

52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर शेअर्स :

सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कंपनीचा शेअर 2.30 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. या वर्षी कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे.त्याच वेळी, या स्टॉकची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 11.45 रुपये आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअर्समध्ये 69.13 टक्क्यांची घसरण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने