आज तुर्कीला मदतीला धावलेल्या भारताच्या NDRFची स्थापना 'या' नेत्यांची व्हीजन होती

तुर्की: तुर्की येथे झालेल्या भूकंपाने संपूर्ण देश हादरलाय. भूकंपामुळे देशभरातील अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. या भूकंपानंतर शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. यादरम्यान तुर्कीमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.या सर्व परिस्थितीत भारताकडून हवी तेवढी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भारताने एनडीआरएफची (NDRF) टीम आणि विशेष प्रशिक्षित श्वान पथक तुर्कीला पाठविले आले. या टीममध्ये 47 एनडीआरएफ जवान आणि वरिष्ठ अधिकारी आहेत जे संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करतात. दोन टीम पाठवण्यात येणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का आज तुर्कीला मदतीला धावलेल्या भारताच्या NDRFची स्थापना कशी झाली आणि यासाठी कोणत्या नेत्यांची व्हीजन होती? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.



तुर्कीला मदतीला धावलेल्या भारताच्या NDRFची स्थापना कशी झाली?

गोष्ट आहे २००१ सालची. प्रजासत्ताक दिनी गुजरातमध्ये चक्क ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने गुजरातला हादरुन सोडलं. यात १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. एवढंच काय तर अनेक घरे-इमारती जमीनदोस्त झाल्या. खरं तर अपुरी मदत आणि आपत्ती निवारण समितीचे अपयश प्रखरपणे दिसून आले. यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.यावेळी त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भविष्यात येणाऱ्या अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे ठरविले. यावर पंतप्रधानांनी सर्वच पक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरवले.त्यावेळी शरद पवार यांचा स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. कॉंग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी स्वत:चा पक्ष उभारला होता. तरीसुद्धा सोनिया गांधी यांनी शरद पवार यांचे नाव सुचवले कारण शरद पवार यांच्याकडे किल्लारी भूकंप, लातूर भूकंपाची परिस्थिती सक्षमपणे हाताळली होती.

यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी एक ३५ जणांची समिती स्थापन केली. समितीचे अध्यक्ष स्वतः ते झाले तर उपाध्यक्ष होते शरद पवार. या समितीत संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, ए.पी.जे. अब्दुल कलाम, ममता बॅनर्जी अशी अनेक मोठे नेते होते. या समितीने सर्वतोपरी अभ्यास केला आणि अखेर २० जानेवारी २००६ ला NDRF ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी डॉ. मनमोहनसिंग यांची सरकार होती.जेव्हा हा कायदा झाला तेव्हा दलात एकूण आठ बटालियन होते. सध्या बटालियनची संख्या वाढवली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये ११४९ अधिकारी व जवान असतात आणि त्यात काही विशेष तुकड्या बनवल्या जातात. तुकडीत ४५ जवान असतात. या तुकड्यांमध्ये इंजिनीअर, टेक्निशियन, डॉग squad, डॉक्टर, इलेक्ट्रिशियन असतात.या NDRF जवानांना पूर, भूकंप, त्सूनामी, पर्वतरांगेतील बचावकार्य, अतिरेकी, नैसर्गिक हल्ल्यांसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने