सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांसाठी "न्यूट्रल साइटेशन" लाँच

दिल्ली:  भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सर्व निकालांसाठी न्यूट्रल साइटेशन म्हणजेच तटस्थ उद्धरण आज सादर केले, अशी माहिती भारताचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी सांगितले.तटस्थ उद्धरण न्यायालयाने दिलेल्या सर्व 30,000 निकालांसाठी असेल, असेही चंद्रचूड यांनी यावेळी स्पष्ट केले.दिल्ली, केरळ उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयांनी यापूर्वीच त्यांच्या निकालांसाठी तटस्थ उद्धरण सादर केले आहे.त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या निकालांसाठी तटस्थ उद्धरण सादर करण्यात आले आहे.



ते म्हणाले की, "आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे तटस्थ उद्धरण सुरू केले असून, हे तटस्थ उद्धरण सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व 30,000 निकालांसाठी लागू असेल.यामध्ये पहिल्या टप्पा 2014 ते 1 जानेवारी 2023 पर्यंतचा, तर दुसरा टप्पा 1950 ते 2013 पर्यंतचा असेल"याशिवाय न्यायालयाचे निकाल इंग्रजीमधून स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी मशीन लर्निंग टूल्सचा वापर केला जात आहे.आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या 2,900 निकालांचे भाषांतर पूर्ण झाले असून, जिल्हा न्यायाधीशांना हे भाषांतर तपासण्यास सांगितले आहे.

मशीनच्या माध्यमातून करण्यात येणारे निकालांचे भाषांतर अचूक आहे की नाही हे तपासण्यासाठी जिल्हा न्यायाधीश, कायदा संशोधक आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एक टीमदेखील असल्याचे चंद्रचूड यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यायालयाच्या निकालांसाठी एकसमान आणि अद्वितीय उद्धरण विकसित करण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे तीन सदस्यीय पॅनेल तयार केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने