महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीबाबत संभाजी ब्रिगेडनंतर 'या' पक्षानं घेतला मोठा निर्णय!

पुणे : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीअर्ज मागं घेण्याकरिता अवघे काही तास उरले आहेत, त्यामुळं पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीतून संभाजी ब्रिगेडनं याआधी माघार घेतलीये.आता आम आदमी पार्टीनं  देखील महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार, किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलीये, अशी घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली.



आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभांची निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढण्याचा निर्धारही मेनन यांनी केलाय. याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज मागं घेण्यास होकार दर्शविला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळालाय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने