मुस्लिम बाहेरून आले नाहीत, हा देश जितका मोदी-भागवतांचा आहे तितकाच..; का संतापले मदनी?

दिल्ली: भारत जितका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत  यांचा आहे तितकाच महमूदचा देखील आहे, असं स्पष्ट मत जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख महमूद मदनी  यांनी व्यक्त केलं.नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर  34 व्या महाअधिवेशनात मदनी बोलत होते. त्याचवेळी त्यांनी भारतीय मुस्लिमांचा मुद्दा उपस्थित केला. भारतात इस्लामोफोबियाची प्रकरणं वाढत आहेत, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख पुढं म्हणाले, 'भारत ही मुस्लिमांची  पहिली मातृभूमी आहे. इस्लाम  हा बाहेरून आलेला धर्म आहे असं म्हणणं निराधार आहे. इस्लाम हा सर्व धर्मांमध्ये सर्वात जुना धर्म आहे आणि हिंदी भाषिक मुस्लिमांसाठी भारत हा सर्वोत्तम देश आहे.'



मुस्लिम समुदायाविरुद्ध द्वेष आणि चिथावणी देण्याच्या घटनांव्यतिरिक्त, अलीकडच्या काळात आपल्या देशात इस्लामोफोबियाची वाढ चिंताजनक पातळीवर गेलीये. अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार भडकावणाऱ्यांवर शिक्षेची मागणीही मदनी यांनी केली. जमियत उलेमा-ए-हिंद ही मुस्लिम समाजाची मोठी संघटना दिल्लीत आपलं अधिवेशन घेत आहे. यामध्ये समान नागरी संहितेसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यानंतर कर्नाटकसह इतर अनेक मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीपूर्वी जमियत उलेमा-ए-हिंदचे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा समान नागरी संहिता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने