आता खर्गेंच्या ‘त्या‘ स्कार्फची चर्चा !

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी सरकारचे वर्णन ‘सूट बूट की सरकार' असे करणाऱया विरोधी पक्षनेत्यांचे राहणीमानही वेळोवेळी चर्चेचा विषय ठरते. डावे पक्षनेते याचा एकमेव अपवाद ठरले आहेत. गरीब कल्याण योजना, एका उद्योगपतीशी जवळीक यावरून राज्यसभेत सरकारला घेरणारे विरोधी पक्षनेते यांनी ते भाषण देताना जो लोकरीचा ‘स्कार्फ' घातला होता तो ‘लुई व्हिटॉन' या प्रसिध्द कंपनीचा व या एका स्कार्फची किंमत किमान ५७ हजार असल्यावरून भाजप नेत्यांनी आता त्यांनाच घेतले आहे.बेंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक दरम्यान इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पंतप्रधान मोदींना जे जॅकेट भेट दिले तेच परिधान करून मोदी काल संसदेत पोचले तेव्हा त्याबद्दल विरोधकांत कुजबूज सुरू झाली होती. हे जॅकेट फेरवापर केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवले गेले होते.



अधिवेशनात यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या ‘लुई व्हिटॉन'च्याच बॅगची व राहूल गांधी कडाक्याच्या थंडीतही जो बर्बेरी चा टी शर्ट परिधान करून चालत होते तो चर्चेचा विषय ठरले होते. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा लुई व्हिटॉन स्कार्फ चर्चेत आला आहे. वरिष्ठ सभागृहात काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणापूर्वी विरोधक अदानी प्रकरणावर गोंधळ घालत होते त्याचवेळी गोयल यांनी खर्गे यांना चिमटा काढला.ते म्हणाले की, जेपीसी तपास वैयक्तिक बाबींमध्ये होऊ शकत नाही. खर्गेजी यांनी आज ‘लुई व्हिटॉन' स्कार्फ घातला आहे त्याच्याही तपासणीसाठी संयुक्त समिती (जेपीसी) स्थापन करावी का? तो स्कार्फ कुठून आणला, कोणी दिला आणि त्याची किंमत किती?' गोयल यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू झाली.मोदींच्या जॅकेटचा संदर्भ देत भाजपचे शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले की मोदींनी शाश्वत विकास आणि पर्यावरणाचा हिरवा संदेश दिला तर खर्गेजी यांनी ५६ हजार ३३२ रुपयांचा महागडा लुई व्हिटॉन स्कार्फ घातला होता. 'स्वाद अपना अपना, संदेश अपना अपना... कोणीही फैसला करत नाही. कोणी लुई व्हिटॉन स्कार्फ किंवा बर्बेरी टी-शर्ट घातला आणि गरिबीबद्दल बोलले तरी काही हरकत नाही. ही ‘त्यांची‘ मानसिकता आहे.

बात निकलेगी तो....

खरगे यांच्या स्कार्फच्या वादात चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही उडी घेतली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी लुई व्हिटॉनचा स्कार्फ त्यांच्या ‘हृदयाच्या‘ इतका जवळ घातला असेल तर काँग्रेसचे धोरणही एलव्ही (कंपनीला) धार्जिणे आहे असे मानायचे का? हीच बेगडी भांडवलशाही आहे का? बात निकलेगी तो दूर तलक चाएगी...असेही अग्निहोत्री यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने