म्हातारी मेल्याचं दुःख नाही; निवडणूक आयोगाच्या निकालावर ठाकरे थेट बोलले

नवी मुंबईः मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आणि निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्याला थेटपणे उत्तर दिलं आहे.निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना निसटू पाहात असतांना राज ठाकरेंची भूमिका काय? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यावर आज राज ठाकरेंनी उत्तर दिलं.

राज ठाकरे म्हणाले की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आणि निवडणूक आयोगातील निर्णयावर येत्या २२ तारखेला भाष्य करेन त्यामुळे आत्ता ट्रेलर, टिझर काहीही नाही. थेट २२ तारखेला सिनेमा दाखवतो, असं राज ठाकरे म्हणाले.यावरुन निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असला तरी भविष्यात असे निर्णय नको, अशीच भूमिका राज ठाकरे मांडणार असा अंदाज बांधला जात आहे. २२ तारखेच्या राज ठाकरेंच्या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.



व्यंगचित्रामुळे वाचनाची आवड- ठाकरे

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, व्यंगचित्रामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. मी फक्त पुस्तकं वाचत नाही तर चेहरेसुद्धा वाचतो. त्यामुळे कोण सोबत राहणार आणि कोण जाणार, हे कळतं. सध्या चांगलं लिहिणारे आणि विषय समजून सांगणारे लेखक गिरीश कुबेर आहेत. त्यांची पुस्तकं मी वाचतो, त्यांचं आंतरराष्ट्रीय घडामोडींवरचं लेखन उत्तम असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने