Prashant Damle यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार, मराठी नाटकांसाठी अभिमानाचा क्षण

मुंबई: आज राष्ट्रपतींच्या हस्ते अकादमी पुरस्कारांचं वितरण झालं. त्यानिमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्कार मिळाला आहे.प्रशांत दामले यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा मोठा सन्मान झाला. मराठी रंगभूमीसाठी आणि मराठी नाटकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.हा सन्मान स्वीकारताना प्रशांत दामले म्हणतात.. हा खुप मोठ्ठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकारांच्या वतीने आणि फक्त महाराष्ट्र,

भारत नाही तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे. अनेक कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी प्रशांत दामले यांचं अभिनंदन केलंय'एका लग्नाची गोष्ट' या गाजलेल्या नाटकातील प्रशांत दामले यांची सहकलाकार आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांनीही प्रशांत दामले यांचं अभिनंदन केलंय.राष्ट्रपतींच्या हस्ते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याचा व्हिडिओ शेयर करत कविता म्हणतात.. आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण.. अभिनंदन प्रशांत अशा शब्दात कविता ताईंनी प्रशांत दामले यांचं अभिनंदन केलंय.



मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मोठं नाव म्हणून प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे पाहिले जाते. तीन दशकांहून अधिक काळ यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. त्यांच्या नाटकांचा चाहतावर्ग मोठा आहे.दामलेंच्या अनेक नाटकांचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे.अगदी एका दिवशी नाटकांचे ५ - ५ प्रयोग प्रशांत दामलेंनी केले आहेत. सध्या प्रशांत मराठी रंगभूमीवर कविता मेढेकर यांच्यासोबत एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकात काम करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने