मुंबई आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात;आझाद मैदानावर आयोजन

बेळगाव: मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवारी (ता. २८) मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे.आज, शुक्रवारी (ता. २५) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलिस अधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी पाहणी केली.तसेच, आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची सोय पनवेल व वाशी येथे केल्याची माहिती दिली.आंदोलनाची तयारी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी मुंबई येथे दाखल झाले आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या विविध शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची राहण्याची सोय केली जाईल.त्याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकूर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे सचिव ॲड. एम. जी. पाटील,



मुंबई आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात

माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, सुनील अष्टेकर, महादेव मंगनाकर उपस्थित होते. त्यानंतर शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक सुरेश माने,सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई यांचे विशेष अधिकारी अनिल जगताप यांच्यासमवेत आझाद मैदान येथे जाऊन पाहणी केली.यावेळी आंदोलनात किती कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यासह इतर प्रकारची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे.त्याचबरोबर विविध पक्षांचे नेते व संघटनांची भेट घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले असून सीमाभागातून आंदोलनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांना टोल फ्री करावा, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.त्याबाबत शनिवारी निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवास करणे सोपे होणार आहे.आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाल्यामुळे कार्यकर्त्यातून समाधान व्यक्त होत आहे. तसेच, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार विविध भागांतून केला जात आहे.सोमवारी दुपारपासून कार्यकर्ते आंदोलनासाठी मुंबईला रवाना होणार आहेत. यासाठी रेल्वे व बसचे बुकिंग केले आहे.

पनवेल, वाशीत राहण्याची सोय

आझाद मैदान परिसरात वेगवेगळ्या प्रकारची कामे सुरू असल्यामुळे वाहन पार्किंग करण्याची मोठी अडचण आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांची पनवेल व वाशी येथे राहण्याची सोय केली आहे. त्या ठिकाणाहून रेल्वेने आंदोलनस्थळापर्यंत पोहोचावे. पनवेल आणि वाशी परिसरात चार ठिकाणी राहण्याची सोय आहे, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने