आशिया कप आयोजनाच्या वादात अश्विनची उडी; म्हणाला पाकिस्तानची हिंमतच नाही की...

मुंबई: भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा आशिया कप 2023 च्या आयोजनावरून एकमेकाशी भिडले आहेत. एसीसी बैठकीत जय शहा आणि नजम सेठी यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर दोन्ही देशातील आजी - माजी खेळाडू एकमेकांवर शाब्दिक बाण चालवत आहेत. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतात होणाऱ्या वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची भाषा केली होती.



या वादात आता भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने उडी घेतली आहे. यापूर्वी पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी 'भारत चुकीचं करत आहे. त्यांनी पाकिस्तानात येऊन आशिया कप खेळला पाहिजे. आयसीसीने याचबाबत निर्णय घेऊन भारतावर बंदी घातली पाहिजे.' इतर खेळाडूंनी भारतात होणाऱ्या वर्ल्डकपवर बहिष्कार टाकावा असेही मत व्यक्त केले.

यावर आता रविचंद्रन अश्विन आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, पाकिस्तान वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येणार नाही असं होणारच नाही.अश्विन म्हणाला की, 'पहिल्यांदा देखील पाकिस्तानकडून अशा प्रकारची विधाने आले आहे. भारत आला नाही तर आम्ही वर्ल्डकप खेळणार नाही. मात्र अशा परिस्थितीत स्पर्धा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आयोजित केली जाते. मला वाटते की यंदाची आशिया कप स्पर्धा श्रीलंकामध्ये व्हावी.'आशिया कप 2023 च्या सप्टेंबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन कोण करणार याबाबत मार्चमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने