रेल्वे सुसाट, अर्थसंकल्पातून मिळालं आजवरचं सर्वात मोठं बुस्टर

दिल्ली: मोदी सरकार आज  २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे. हा अर्थसंकल्प येत्या काळात देशाची स्थिती आणि दिशा ठरवणार आहे. तसेच या अर्थसंकल्पातून मोदी सरकारी दिशा देखील ठरणार आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. आतापर्यंत सर्वांधिक मोठी आर्थिक मदत आहे. २०१३-१४ च्या तुलनेतील ९ पट मदत केली आहे. तसेच ५० नवी विमानतळं उभारणार असल्याचे घोषणा देखील  निर्माला सीतारामन यांनी केली आहे. 



रेल्वेमध्ये १०० नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय नवीन योजनांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. खासगी क्षेत्राच्या मदतीने १०० योजना शोधण्यात आल्या आहेत. ज्यावर यापुढील काम केले जातील.गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला एकूण १४०३६७.१३ कोटी रुपये दिले होते. गेल्या अर्थसंकल्पातही सरकारने रेल्वेच्या बजेटमध्ये वाढ केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर रेल्वे बजेटमध्ये २० हजार कोटींहून अधिक वाढ झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने