"मोदी अदानी भाई-भाई " ; विरोधकांची राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी, मोदींची कोंडी!

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले होते.दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोदी अदानी भाई-भाई, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. काल लोकसभेत केलेल्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी अदानी प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नव्हते.






विरोधकांनी गौतम अदानी प्रकरणात चौकशीची मागणी केली. नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभागृहात 'मोदी-अदानी भाई-भाई'च्या घोषणा अनेकवेळा देण्यात आल्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधी खासदारांना टोला लगावला. यावेळी मोदी यांनी देखील विरोधकांना टोला लगावला. कितीही चिखल फेका कमळ चिखलातच चांगलं फुलते. राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेत सडकून टीका केली होती. त्याला मोदींनी काल लोकसभेत उत्तर दिलं, पण यामुळं समाधान न झाल्याने आज राज्यसभेत मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. पण मोदींनी सेक्युलॅरिझमचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदी म्हणाले, "विविध सरकारांनी ज्या ज्या योजना आणल्या, त्या सर्व पात्र लाभार्थांपर्यंत पोहोचत आहेत की नाही, हे निश्चित करण्याचं काम खरा सेक्युलॅरिझम करत असतो"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने