MPSC : राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर!

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा  परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे.  उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांच्या याद्या व गुण आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-२०२२ करिता उमेदवारांनी विविध संवर्गाकरिता दिलेले विकल्प विचारात घेऊन सदर पूर्व परीक्षेतून (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा संवर्गनिहाय निकाल आज जाहीर करण्यात आला. 

१ . प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अहंताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. 

२. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

३. प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीतील तरतूदीनुसार अर्जात प्राविण्यप्राप्त खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या दिनांक १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार व त्यास अनुसरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या दिनांक १८ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या शुध्दिपत्रक व दिनांक ११ मार्च, २०१९ व दिनांक २४ ऑक्टोबर, २०१९ रोजीचे शुध्दीपत्रक आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विषयांकित गट-अ व व पदांसाठी निश्चित केलेली क्रीडा विषयक अर्हता धारण करीत असल्याबाबत, पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकांचे म्हणजेच दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ रोजीचे किंवा तत्पूर्वीचे क्रीडा प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असून याच दिनांकापूर्वी सदर क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागीय उप संचालकांकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती सादर करणे आवश्यक आहे.



तसेच यासंदर्भातील संबंधित क्रीडा उप संचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्यावेळी सादर करणे अनिवार्य राहील. 

४. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक

प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. ६. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेजद्वारे कळविण्यात येईल.

५. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.

६. मुख्य परीक्षेची अधिसूचना व दिनांक स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने