भीकू म्हात्रेनं इतिहास घडवला..तरिही मनोज वाजपेयी म्हणतोय,'या भूमिकेनं जगणं केलेलं मुश्किल..'

मुंबई: मनोज बाजपेयी हा सिनेजगतातला प्रसिद्ध चेहरा. 'गॅंग्स ऑफ वासेपूर','सत्या','शूल','सत्यमेव जयते','सोनचिडिया' आणि असे कितीतरी दर्जेदार सिनेमे करून त्यानं आपल्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.सध्या मनोज वाजपेयी पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचा एक सिनेमा येत आहे 'गुलमोहर', ज्यात शर्मिला टागोर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. कावेरी सेठ,सूरज शर्मा देखील आहे.ओटीटीवर हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्यानं एका मुलाखतीत आपल्या 'त्या' भूमिकेविषयी सांगितलं..जिनं त्याचं पूर्ण आयुष्यच बदललं.भीकू म्हात्रे 'सत्या' सिनेमातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा आहे. 

मनोज वाजपेयीनं ही व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमानं एका अभिनेत्याला फक्त स्टार बनवलं नाही तर त्यानं साकारलेल्या त्यातील मुंबईच्या गॅंगस्टरच्या भूमिकेनं त्याला अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरवलं.पण या भूमिकेनं त्याला दिलेली प्रसिद्धी थोडी भारीच पडली. कारण त्यानंतर लोक त्याला खलनायकाच्या भूमिकाच ऑफर करू लागले. पण मनोजनं मात्र निश्चय केला होता की तो पून्हा असे व्हिलनचे रोल करणार नाही.त्यानं तसे सगळे रोल रिजेक्ट केले. आणि त्यानं करिअरमध्ये जे नियोजलं होतं त्यावर ठाम राहिला.मनोज वाजपेयीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तो या गोष्टीवर अडून बसला होता की त्याला व्हिलनची भूमिका करायचीच नाही. आणि म्हणूनच तो कितीतरी महिने कामाविना राहिला.



तो म्हणाला, ''सत्यानंतर इंडस्ट्रीनं मला नव्या व्हिलनच्या भूमिकेत पाहिलं. मी म्हणायचो की मला व्हिलनच्या भूमिका नाही करायच्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला आठ महिने चक्क कामासाठी वणवण फिरावं लागलं''.''माझ्याकडे खूप ऑफर्स यायच्या पण त्या सगळ्या व्हिलनच्या भूमिकेसाठी असायच्या. पण मी काहीतरी वेगळाच विचार केला होता. काम नसल्यामुळे पैशाची तंगी सुरू झाली होती. कामाला नाही म्हणणं पुढे पुढे मुश्किल होऊन बसलं होतं''.''खरंतर 'सत्या'आधी माझ्याकडे ना काम होतं..ना पैसे. आणि 'सत्या' नंतर मी दोन्हींना नाही म्हणत होतो. मला नाही माहित होतं की मी असं करून योग्य करत होतो की अयोग्य''.

'सत्या' नंतर मनोज वाजपेयीनं राम गोपाल वर्मोसोबत पुन्हा काम केलं. 'कौन', 'रोड' सारख्या सिनेमात तो दिसला होता. याव्यतिरिक्त 'शूल', 'दिल पर मत ले यार','एकेस' सारख्या सिनेमात त्याला काम करण्याची संधी मिळाली.अभिनेत्यानं 'स्पेशल २६', 'अलीगढ',' डायल १००' सारखे धमाकेदार प्रोजेक्ट्सही केले. 'फॅमिली मॅन' सीरिजमुळे तर तो ओटीटीचा सुपरस्टार बनला.सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याची गणना केली जाऊ लागली. आता ३ मार्च रोजी तो डिस्ने प्लस हॉट स्टारवर तो 'गुलमोहर' मध्ये दिसणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने