संघ बदलत आहे, भाजपनेही बदलावे; संजय राऊत

नवी दिल्ली : संघ स्वत:ची भूमिका बदलून जातधर्म विरहित राजकारण करीत असेल तर सरसंघचालकांनी सर्वात आधी हा मंत्र भाजपला दिला पाहिजे, असे मत शिवसेनेचे (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतेच जातिव्यवस्था देवाने नाही तर पंडितांनी तयार केले असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर राऊत यांनी संघ हळूहळू बदलत आहे, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.मुख्यमंत्र्यांनी आवाहन करू द्या अथवा कुणालाही आवाहन करू द्या, निवडणुका होणारच. त्यांच्या आवाहनाला काही अर्थ नाही. दोन्ही निवडणुका होतील. महाविकास आघाडीत मतभेद नाही.एकत्रित निवडणुका लढवण्यावर आघाडी ठाम आहे.कॉंग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांच्या संदर्भातही राऊत यांनी भाष्य केले आहे. तांबेंच्या संदर्भात कॉंग्रेस नेत्यांनी याविषयावर माझ्यासोबत चर्चा केली. कॉंग्रेस नेते आणि आम्ही एकमेकांसोबत भेटत असतो. तेव्हा राज्यातील घडामोडींविषयी चर्चा होत असते.



‘नाणारबाबत स्थानिकांची भूमिका समजून घ्या’

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाणारचा प्रकल्प आणणारच असे वक्तव्य केले. परंतु, त्यांनी अगोदर स्थानिकांची भूमिका आणि भावना समजून घेतली पाहिजे.एखाद्या उद्योगपती किंवा परदेशी कंपनीला कंत्राट देण्यासाठी भाजपचेच लोक आणणारच, करणारच असे वक्तव्य करीत असतात.या बाबींमुळे देशाची काय अवस्था झाली आपण पाहात आहोत. नाणारच्या अवतीभोवती ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत त्यांची फडणवीस यांनी यादी जाहीर करावी. जमिनदारांसाठी नाणारचा प्रकल्प आणला जात आहे. ही गुंतवणूक कुणाची आहे? गुंतवणूकदार कोण आहेत? कुणाचा पैसा आहे? याची यादी जाहीर करावी अन्यथा आम्ही जाहीर करू, असा इशारा राऊत यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने