केएल राहुलवर ट्विट करणाऱ्या पत्रकाराला शशी थरूरांना संजू सॅमसनची करून दिली आठवण

मुंबई:   भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार केएल राहुलला मिळणाऱ्या संधींबाबत अनेक आजी माजी क्रिकेटपटू बोलत आहेत. भारतातील वरिष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी देखील याबाबत ट्विट केले होते. मात्र या ट्विटवर खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देताना भारताचा विकेटकिपर फलंदाज आणि सातत्याने संघात आत बाहेर होणाऱ्या संजू सॅमसनच्या विषयाला वाचा फोडली.शशी थरूर यांनी शेखर गुप्तांच्या केएल राहुलबद्दल केलेल्या ट्विटला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'आणि संजू सॅमसन बाबत काय? 



वनडेमध्ये 76 ची सरासरी तरी देखील त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेतून त्याला वगळले. तुम्हाला कामगिरी न करणाऱ्यांना दीर्घकाळ संधी देणे योग्य आहे. मात्र गुणवान कामगिरी करण्याऱ्यांवर खर्च करणे जमत नाही?'शशी थरूर हे संजू सॅमसनचे जाहीररित्या समर्थन करत असताता. काँग्रेसचे खासदार केरळच्या या विकेटकिपर फलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी ट्विटरवर चांगलेच सक्रीय असतात. संजू सॅमसन हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र त्याचे संघातील स्थान अजून पक्के झालेले नाही. तो संघात आत - बाहेर करतोय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने