लोकसभेत राहुल गांधीनी फडकवले मोदी-अदानींचे पोस्टर, लोकसभा अध्यक्ष म्हणाले..

दिल्ली: हिंडेनबर्गच्या अदानी समूहाच्या अहवालावरून संसदेत गदारोळ अद्याप सुरुच आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले, मात्र दोन्ही सभागृहात कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेत मंगळवारीही विरोधी पक्षांनी अदानी समूह या मुद्यावरुन गदारोळ केला. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो दाखवत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी चांगलेच सुनावले. राहुल गांधी लोकसभेत बोलत होते. गौतम अदानी यांच्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे नातं काय? असा सवाल उपस्थित केला. तसेच दोघांचे एकत्र फोटोदेखील दाखवले.

लोकसभेत नेमकं झालं काय?

लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे एकत्र फोटो दाखवले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राहुल गांधीना सुनावले.पोस्टरबाजी बंद करा, अन्यथा सत्ताधारी पक्षाचे लोक राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि अदानी यांचे एकत्र फोटो दाखवतील. असा इशारा दिला.



काय म्हणाले राहुल गांधी?

2014 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी 609 व्या क्रमांकावर होते, जादू झाली की नाही माहित नाही पण ते अचानक दुसऱ्या स्थानावर आले. लोकांनी विचारले की हे यश कसे मिळाले? आणि भारताच्या पंतप्रधानांशी त्याचे काय नाते आहे? असे अनेक सवाल उपस्थित होत आहे.असे सांगत ते म्हणाले, अनेक वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. पीएम मोदींच्या खांद्याला खांदा लावून उभा असलेला एक माणूस पंतप्रधानांशी एकनिष्ठ होता आणि मोदींना पुनरुत्थानशील गुजरातची कल्पना तयार करण्यास मदत केली. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी दिल्लीत पोहोचले तेव्हा खरी जादू सुरू झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने